भास्करराव, प्रवासीजी, प्रभाकर, सुभाषचंद्रजी,
आपल्या अभिप्रायांबद्दल आभारी आहे.मात्र, ते वाचल्यावर मला जाणवले की माझे लिखाण कोठेतरी कमी पडले. ही कविता केवळ एका मद्यप्याची कैफियत आणि मद्यपानाची भलामण म्हणून वाचली गेली. त्यापलिकडे मला जे म्हणायचे होते ते सांगण्यात मी अपयशी ठरलो.
भास्करराव, माझा कोणावरही राग नाही-ना सनातन्यांवर ना पुरोगाम्यांवर.आणि सनातनी वृत्तिस विरोध करणारा नास्तिकच असतो असे तुम्हास का वाटते?माझा धर्मावर, पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि म्हणूनच धर्माच्या मुळावर उठलेल्या अनिष्ठ गोष्टी, धर्माच्या नावावर चाललेल्या भ्रामक आणि अर्थहीन थोतांडाला विरोध आहे. परकिय आक्रमकांनी केले नसेल एवढे धर्माचे नुकसान स्वघोषित धर्म-मार्तंडांनी केले असे मी मानतो. असो, प्रत्येकास आपले मत असण्याचा आणि ते मांडण्याचा अधिकार आहे.

आपला (अपयशी)(आस्तिक)

मिलिंद