व्वा श्री. संजोप राव!
लेख सुंदर आहे. सांगलीची सफर घडवून आणलीत. सांगलीला कधी गेलो नाही पण आपल्या लेखाने सांगलीचे एक सुंदरसे चित्र उभे केले आहे. कधी काळी सांगलीला जाण्याचा योग आलाच तर तुमची आणि तुमच्या ह्या लेखाची आठवण नक्की नक्की नक्कीच येईल.
लेख, खाण्यापिण्यावर जरा जास्त रेंगाळला म्हणून (मलातरी) काही फरक पडत नाही. तरी सुद्धा, सांगलीशी असणारे तुमचे भावनिक बंध तिथल्या सार्वजनिक आयुष्याच्या, सण-उत्सवांच्या, नदीकाठच्या रम्य संध्याकाळच्या क्षणांच्या वर्णनाने अधिक उलगडले असते असे वाटते.
एकूणात सांगलीचा फेरफटका मस्त झाला.
अभिनंदन.