कधी कधी एखाद्या पाककृतीसमोर आपली 'डाळ शिजत नाही' हे बाकी खरे.

पुरण वाटण्यासाठी पुरण यंत्र नसेल तर पाटा-वरवंट्यावर वाटतात. अर्थात, अमेरिकेत पाटा-वरवंटा कोठून आणणार ही सुद्धा एक समस्याच. छोट्या प्रमाणात करायचे असेल तर स्वयंपाकघरातील वर्क टॉप वर लाटण्याने पुरण वाटून घेता येते. पुरण गरम असतानाच चांगले वाटले जाते. डाळ शिजवताना १ टेबलस्पून तेल आणि शेंगदाण्याएवढा सोडा घातल्यास डाळ छान मऊ शिजते.

त्या पंजाबी मैत्रीणीने कधी पुरणाच्या पोळ्या करून पाहिल्या का? त्यांच्यात 'पुरनसींग' नांव असते म्हणजे त्यांच्यातही पुरण बनवितात का? (उगीच एक शंका).