नमस्कार! अप्रतिम वर्णन केलेत तुम्ही सांगलीचे. मी सांगलीचीच आहे. त्यामुळे हा लेख मला खूपच भावला.
आजही बर्याच गोष्टी तश्याच आहेत सांगलीत. कुलकर्णी वडेवाल्यांची गाडी देखिल बागेसमोर असते. पण इतक्या वर्षात त्या गाडीचा मालक नव्हता पाहिला मी.
"सुंदर" हत्ती नंतर "बबलू" हत्ती होता. आता तो ही गेला, २-३ वर्षांपुर्वी. तेव्हाही सांगली तितकीच दुःखी झाली. तसाच ३६ की ३२ गुणी हती अजून न मिळाल्यामुळे ती हत्तीची जागा मात्र रिकामी आहे. गणपतीचे देउळ आता अतिशय सुंदर दिसते, कारण राजेसाहेबांनी त्याचे सुशोभिकरण केले आहे.
अजून बरेच नवीन बदल झाले आहेत सांगलीत. मोठे मोठे मॉल्स-जसे की मेगा मार्ट, डी मार्ट, विविध ब्रँडस ची दुकाने-कुटॉन्स, आदिदास इ.
तसेच डॉमिनोज पिझ्झा, नॅचरल्स आईस्क्रिम, प्रसिद्ध दांडेकरांचे विश्रामबाग ला ३-४ मजली शॉपिंग काँप्लेक्स अश्या भरपूर सुधारणा झाल्या आहेत. आता पुन्हा गेलात तर एक सुधारित शहर तुमच्या नजरेस पडेल.