काहितरी निराळे केल्यास आपण प्रकाशझोतात येऊ वगैरे फुटकळ कल्पना डोक्यात घेणारे काही रिकामटेकडे तरुण तरुणी असतात त्यांच्या उद्योगाची दखल घेण्याचे काही कारण नाही.
असले काही चक्रम उद्योग करून कुठे टीव्ही चॅनल्स किंवा युवा खास पुरवणीत पेपरमध्ये चमकता यावे म्हणून हे असले चाळे करतात असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्यात गुणवत्ता नसेलच असे नाही, पण धीटपणा आहे हे मान्य करावे लागेल. यातुनच एखाद्या आवडत्या व्यक्तीला विशेषतः मुलिला छेडण्यासाठी सुद्धा हा खेळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
थोडक्यात सांगायचे तर हा निव्वळ वायफळ चाळा आहे! याचा उपयोग कमी आणि उपद्रव जास्त होण्याचाच जास्त संभव आहे. पाहू पुढे काय होते आहे ते!