प्रवासी महोदय,
मुद्दा चांगला आहे. पण अनुत्तरित प्रश्नांच्या दिशेने घेऊन जातो... (हा प्रतिसाद वाद ऐवजी चर्चा या रूपाने बघावा.)

हे सगळे ज्ञान आपल्याकडे होते तर आपल्याकडे औद्योगिक क्रांती का नाही झाली?  मीही या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे.
"योजकस्तत्र दुर्लभः" असे झाले असावे काय?

औद्योगिक क्रांतीमध्ये वाफेच्या संयंत्राचा मोठा हातभार होता. (जाता जाता - जेम्स वॅट च्या आधी वाफेचे संयंत्र होते. वॅट ने त्याच्यात आमूलाग्र बदल केले. पण तेंव्हा संकल्पना अस्तित्वात होती.) मग असे संयंत्र, अगदी त्याच्या प्रगत अवस्थेत नसेल, पण (अती) अप्रगत अवस्थेत भारतात बनले होते का?

वाफ कोंडली गेली की झाकण उडून पडते, ही सामान्य आणि घरोघरी दिसणारी घटना आहे.

समजा आपल्या "अमुक" ग्रंथात त्याबद्दल माहिती लिहिली आहे. आणि जुन्या काळी (उदा. १५वे शतक) तो "अमुक" ग्रंथ जाणणाऱ्या पंडिताने आयुष्यात एकदा तरी ती घटना अनुभवली/ऐकली असेलच. मग ते पाहून अश्या संयंत्राची रचना झाली होती का?
(वाफेचे उदाहरण घेतले आहे, आणखी अनेक गोष्टी आहेत.)

"योजकस्तत्र दुर्लभः" असे झाले असावे काय?

एव्हढे सगळे ग्रंथ असून शिवकर बापूजी तळपदे एव्हढाच एक संशोधक झाला की काय?