काय ग्लानी याहुनी बाकी असे धर्मास येणे?
झोपलेला शेषशायी का कधी उठणार नाही?

माजले सत्तांध कौरव, मातले कामांध रावण
लाज दुबळ्यांच्या घरांची राखली जाणार नाही

उंबऱ्यावर सांजकाळी पेंगती पाळीव बोके
एकही स्तंभातुनी का गर्जना घुमणार नाही?

------- हे शेर खास! 'स्तंभा' वरचा  श्लेष आवडला.

-- जयन्ता५२