परवाच माझ्या मैत्रिणीनी मला खुश होऊन तिच्या भाऊ भावजयनी आणलेलं केशर दाखवलं. आणि म्हणाली, "अगं आमच्या सगळ्यांसाठी आणलं लक्षात ठेवुन." पण मला वाईट वाट्लं, कारण हे मला माहीत होतं.
लक्षात ठेवून आणले यात काही चूक वाटत नाही. ते त्यांना मोफत मिळाले होते का घरदार विकून, हे गौण आहे असे वाटते.
तसेही ते केशर मोफत नाहीये/नव्हते. जगात कोणीही असा धंदा करू शकत नाही. आणि त्यासाठी केलेला आटापिटा पाहता ते मोफत बिलकुलच नाही. त्या आट्यापिट्याचे कौतुक करायचे का नाही किंवा हसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण अवहेलना करायची गरज नाही असे वाटते.
हे म्हणजे (७५%) सेल मध्ये मिळालेले रीबॉक चे (एरवी महागडे) बूट मला भेट म्हणून नको, असेच म्हणण्यासारखे आहे.
आमच्यासाठी भेट आणायची तर ती पूर्ण किमतीलाच आणि विकतच आणलेली हवी हा अट्टाहास आहे असे वाटते. आणि नाहीतर आणूच नका ही टोकाची भूमिका आहे असे वाटते.
"लक्षात ठेवून आणले" यातला आनंद "माझ्या मैत्रिणीला" कळला असे वाटते. कारण लक्षात ठेऊन आणले यात काहीच खोटं नाहीये. त्या खरेदीत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष बचत करण्यात काही चूक आहे असे वाटत नाही.
नका ना आणु कही, आग्रह आहे का? पण असं खोटं नका वागु.....
जर का चोरून, लुबाडून भेट आणली असेल तरच हे वाक्य लागू होते. नाहीतर नाही.