चौकसराव, मानले बुवा आपल्याला. भारतातील दुचाकी वाहनांचा गेल्या ३५ वर्षांचा आढावा किती सहजपणे घेतला.
 
किमती व दरमहा इंधनासाठी मोजावे लागणारे पैसे याचा हिशेब करून निवृत्त होईपर्यंत केवळ लुना चालवणारे कितीतरी गृहस्थ बघायला मिळायचे.  
माझीही पहिली गाडी लुनाच होती. आमच्या शहरात बरेच ठिकाणी उतार असल्याने मी बरेचदा लुनाचे सायकलिंग चे बटण दाबून इंधन वाचवीत असे.   
२००३ पासून बजाजने पल्सर ही मोटर सायकल आणून दुचाकी चालविण्याचे सर्व संदर्भच बदलले. भन्नाट पिक-आप्पा, शक्तिशाली ब्रेक, इतर गाड्यांच्या इंजिनापेक्षा थोडा अधिक आवाज करणारे इंजिन व गरज नसेल इतका कर्कश हॉर्न. अनेक अती-उत्साही तरुण ऐन ट्रॅफिकमधून वेगाने झिग-झॅग करीत जाऊ लागले. त्यामुळे अनेकदा इतर साधी वाहने चालविणारे ज्येष्ठ नागरिक व महिला बिचकून जाऊन अपघात होवू लागले. काही वर्षांत इतरांनाही सवय झालीच.
 
परंतु लाल सिग्नल असतानाही उगाचच कर्कश हॉर्न वाजविण्याची सवय मात्र दिवसें-दिवस वाढतच आहे हि मात्र काळजीची बाब आहे. नशीब बजाजएवढे इतर कंपन्यांच्या गाड्यांचे हॉर्न कर्कश नाहीत. 

या विषयावरील पुढील लेखाच्या प्रतीक्षेत!