त्यातून भाषेचा उपयोग अर्थ प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हवा असं मी मानतो. ही गझल आहे तो फॉर्म आपण उर्दूतून घेतला आहे त्यामुळे ‘जिंदगी’ ‘जीवना’पेक्षा जास्त आकर्षक पर्याय आहे. केवळ भाषेच्या आग्रहामुळे अभिव्यक्तीची नजाकत कमी होऊ नये असं माझ मत आहे. गद्यात शब्दांचा पसारा असू शकतो पण कवितेत सगळं तोलूनमापून करावं लागतं त्यामुळे इतकी जर सवलत नसेल तर सगळी मजाच निघून जाईल. इथे कविता आहे तशी प्रकाशित झाली म्हणजे शब्द मंजूर असावा.

संजय