विनोदी लेखात इतके तांत्रिक तपशील एवढ्या सोप्या भाषेत? मस्त. विरूद्ध बाजूला ब्रेक आल्यावर तर वाटच लागणार.
सनीमध्ये फारतर माणसाची सावली वाहून न्यायची ताकद होती.
सुझुकीचे गियर सगळे पावलाच्या पुढच्या भागाने खालच्या दिशेला पडत. होंडाचे बरोबर उलटे - टाचेकडून खालच्या दिशेला. यमाहा अजूनच अत्रंग. पहिला पावलाच्या पुढल्या भागाने खाली. बाकीचे टाचेकडून खाली.
'मेकॅनिकली चॅलेंज्ड' जनतेची अवस्था होत असे.
वा! हहपुवा झाली.
म्हातारीला लिपस्टीक पावडर फासणे वगैरे लाजबाब. अजूनही बजाजवाले गंजणारे स्क्रू वापरतात.
पूर्वीच्या काही स्कूटर्सना दोन गेअर्स तर काहींना तीन हे वाचूनही करमणूक झाली. ते रॉड ड्रिव्हन आणि चेन ड्रिव्हन दुचाक्या ही काय भानगड आहे हो?
अप्रतिम अशा खुसखुशीत लेखद्वयीबद्दल धन्यवाद.
त्यावरून आठवले, मुंबईत भरपूर सार्वजनिक वाहनांमुळे ऐपत असूनही दुचाकी कोणी फारसे वापरीत नाहीत. वापरली तरी दुचाकीला तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. तरुणाईत क्रेझ असते तीही चारचाकींची. आमच्या कॉलेजात एकमेव मर्सिडीस येत असे. एका मुलीची, तीही तिला बिचारीला कधी चालवायला मिळाली नाही. शोफर तिला आणायला न्यायला येत असे.