>तुम्ही प्राप्त केलेल्या या स्थितिचे या स्थितिच्या अनुभवांचे व आपल्याला या स्थिती मधून होणारे या जगाचे दर्शनाचे वर्णन करणारा एक उत्तम लेख होउ शकतो

= ही स्थिती आपलं स्वरूप आहे, ते आपल्याला आता आणि नेहमी उपलब्ध आहे. आपण आणि स्थिती वेगळी नाही.

मला जगाचं कोणतही वेगळं दर्शन होत नाही. मी देखील तुमच्यासारखाच जगतो. मला जग तुमच्या सारखंच दिसतं फक्त माझा मूड लाईट असतो त्यामुळे जगण्यात मजा येते.

मी हे विस्तारनं यासाठी लिहीतोयं की सत्य गवसलेल्या व्यक्तीबद्दल अपरंपार गैरसमज आहेत आणि दुर्दैवानं आध्यात्मिक पुस्तकात ते बढाचढाके वर्णन केलेत.

आपण मन आणि शरीर यापेक्षा वेगळे आहोत हा तो साधा, मुळात असलेल्या वस्तुस्थितीचा अनुभव आहे.

>यात आपले शरिर निद्राधीन जाल्यावर तुम्ही तर जागे असता त्या अनुभवाचाही उल्लेख करावा हि विनंती!

= हा अनुभव निराकाराचा बोध दिवसा सघन होत रात्रीपर्यंत पोहोचला तर येतो, आपण एकदम तिथून सुरुवात करू शकत नाही.

तुम्ही प्रथम निराकार जाणा, कारण तो बेसिक बोधच दुर्लभ आहे. एकदा निराकार जाणलात की सारं अस्तित्व निराकाराचंच बनलंय हे तुमच्या लक्षात येईल. एकदा आपल्या आत कोणीही नाही हे कळल्यावर जी निश्चिंतता येते त्यातून सकाळचं धकाधकीचं जीवन निवांत होतं मग तो निवांतपणा निद्रेत प्रवेश करतो.

तुम्ही स्टेप बाय स्टेप जा, सोपंय!

संजय