रोहिणी ताई,

आषाढीच्या निमित्ताने येऊ द्या अजून काही फराळी पदार्थ !

कच्चा बटाटा टाकायचा हा नवीन प्रकार ऐकीवात नसल्याचे माझ्या दोन्ही बॉसचे ( आई व सौ ) म्हणणे आहे. प्रयत्न करून पाहायला हवा.

शेंगदाणा कुटात मध्ये मध्ये अर्धे दाणे आले की खाताना व सजावटीसाठी चांगले दिसतात असे माझे मत आहे.    

मी कोल्हापुरला एका हॉटेल मधील साबु.वडा खाल्ला होता त्यात काजूचे छोटे तुकडे व किसमीस (मनुका) घातले होते. नवल वाटल्याने मालकांना विचारले - "संकष्टीच्या दिवशीच आम्ही फक्त काजू व किसमीस (मनुका) घालतो व  दर संकष्टीला दोन ते अडीच हजार वडे आम्ही विकतो हे त्यांनी अभिमानाने सांगितले."