जिंदगी या शब्दाचे मूळ फारसी असले तरी त्यावरून मराठीत जिंदगी, जिंदगानी, जिनगाणी, जिनगानी, जिनगी इतके शब्द आले आहेत. कुठल्याही अर्वाचीन भाषेत मूळ शब्द फारच थोडे असतात. बहुतेक शब्द दुसऱ्या भाषेतून जसेच्या तसे किंवा थोडाफार बदल होऊन आलेले असतात. मराठी भाषेतले बहुतेक शब्द संस्कृत, प्राकृत, हिदुस्थानी, फारसी, अरबी, तुर्की, पोर्तुगीज, तामीळ, कानडी, तेलुगू, गुजराथी किंवा इंग्रजी या भाषांतून आलेले आहेत.
मूळ अर्थ जीवन हा असला तरी मराठीत जिंदगी हा शब्द मालमत्ता, जिणे, निर्वाहाचे साधन या अर्थांनीही वापरता येतो.---अद्वैतुल्लाखान