रिक्षा चालकांशी माझं वैर नाही. पण जे जे म्हणून सर्व्हिस सेक्टर (मराठी शब्द सुचला नाही) मध्ये आहेत त्यांच्यासाठी तरी
"जावे त्याच्या वंशा .. " असं म्हणणं, निदान मला तरी जड जातं. कवितेत वर्णन केलेल्या सर्व परिस्थिती सर्व समावेशक नाहीत.
अजूनही अनुभवानुसार प्रवाशांना त्यात नवीन परिस्थितींचा समावेश करता येईल. रस्त्यावर उभं राहिल्यावर , मुख्यतः कामावर
जायचे असल्यास , जे भोगावं लागतं , ते पाहिल्यावर कवितेतलं वर्णन बरोबर आहे , असा माझा तरी समज आहे व त्याचा बऱ्याच
लोकांना अनुभव आला असणार. आपल्या दृष्टीने तो चुकीचा असू शकेल. पण ज्यावेळेला दूर राहणाऱ्या माणसांना , ऊन पाऊस
भारी असताना केवळ रिक्षावाले यायला तयार नाहीत, म्हणून घरी चालत जावं लागतं तेव्हा त्यांची पण काही बाजू असेल , असं
मानण्याइतका मी तरी निर्विकार नाही. तसेच रिकाम्या रिक्षा समोरून जात असताना किती संयम बाळगणार ? मी लिहिलेलं
उत्तर आपल्याला टीकात्मक वाटत असेल, पण आपण कोणालाही विचारून पाहावं रिक्षा , टॅक्सी व बस( बेस्ट बसेस नाही)
चालकांचे अनुभव फार क्वचितच चांगले येतात असं आढळून येईल. असो. आपण माझे विचार एकांगी आहेत असं लिहिल्याने
हा सर्व प्रपंच करावा लागत आहे. आपल्याला हे उत्तर न रुचल्यास क्षमस्व , एवढच माझं म्हणणं आहे. गैर समज करून घेऊ नये.
आपण त्यांचा विचार केलात म्हणून किंवा मी केला नाही म्हणून रस्त्यावरची परिस्थिती बदलत नाही.