कविताला एक मूड असतो, पहिली ओळ सुचते, मग काही वेळानं दुसरी सुचते आणि मग काही वेळात कविता पूर्ण करावी लागते. ते गाण्यासारखं आहे, तो मूड कायम नसतो.

गद्य लेखनात (मी करतो त्या) माझ्याकडे अनंत मटेरियल आहे. तिथे मला मनाचा ऐकेक पैलू दिसतो.   लय, नादमयता, यापेक्षा प्रश्नाची उकल महत्त्वाची असते. तिथे त्या विषयाला अनुसरून पाचसहाशे शब्द लिहीले की मला शेवट दिसतो, मग मी लेखन संपन्न करतो.

कवितेत एखादं कडवं राहिलं असं मला अजून तरी वाटलं नाही, गद्यात तसं वाटलं तर मात्र मी प्रकाशनापूर्वी संपूर्ण नवा पॅरा ऍड करतो!

तुमच्या मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

संजय