मनोगतावर छत्‍र आणि छन्‍न हे शब्द जवळजवळ सारखेच दिसतात. तसाच घोटाळा होऊन  मी  डिस्‍नी हा शब्द डिस्‍री असा वाचला.   हा कुठला नवा चॅनेल असे मनात येऊन नवल वाटले. Disney चा इंग्लिश उच्‍चार डिज़्‍नी‌ , मराठी उच्‍चार डिस्‍ने.  त्यामुळे दूरदर्शनच्या त्या वाहिनीला डिस्नी न म्हणता मराठी पद्धतीने चक्‍क डिस्‍ने म्हणावे.

चॅनेलवरच्या कार्यक्रमांची नावे वाचली की हा चॅनेल मराठी बिघडवायलाच निर्माण झाला आहे असे वाटते.  बाकी बाकीच्या मराठी वाहिन्या थोड्याफार प्रमाणात तेच करत आहेत, त्यांत आणखी एकीची भर.