आपली कविता चांगली आहे. त्यातील अनुभव देखील अनेकांना आले आहेत. त्यापैकी कांही बाबतीत रिकषावाल्यांचाही इलाज नसावा.
सोलापुरात मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. भाडे ठरवावे लागते. काही रिक्षावाले वीस रुपये भाडे ठरले असतांना जागेवर पोचल्यानंतर तीस ठरले असल्याचा वाद माणसे, वस्ती वगैरे पाहून उभा करतात. मोठा आवाज, अरेरावी अशा अस्त्रांद्वारे माणसावर मानसिक दबाव आणतात. ईतरेजनही यात कोणाची बाजू घ्यायची या सभ्रमात पडतात. त्यांनी प्रवाशाची बाजू घेतली तरी गरिबी , जात वगैरे चा उपयोग सुरू होतो. शेवटी प्रवासी अधिक तमाशा नको म्हणून तीस रु. देतो. रिक्षावाला जितं मया थाटात पुन्हा नव्या सावजाच्या शोधात निघून जातो. हे ठराविक लोक असतात. सरसकट नाहीत. परवा पुण्यात सहकारनगर ते उद्यान प्रासाद सकाळी ११चे सुमारास प्रवास केला. नेहमीचा प्रवास असल्याने भाडे सुमारे चाळीस  होते हे माहीत. तेथे उतरतांना काळजी घेत असल्याचा आव आणून 'काका हळू उतरा' वगैरे म्हणत त्याने मीटर पाहून ० केला. उतरता उतरता मी मिटर ४.१० वरून ४.२० वर पडतांना पाहिला होता. मी मागणी केली नसतांना दरपत्रक काढून ७० रु झाल्याचे सांगितले. मी कसे काय विचारल्यावर ६.९० चे ७० होतात म्हणाला. मी वाचलेले रीडिंग तर ४.२० होते ते मानीना. पुन्हा मोठा आवाज, अरेरावी, पेत्रोल दरवाढ आदी विषय वापरून गर्दी जमवली. आता मिटर रिडिंग ० करून ठेवल्यावर करायचे काय मग ६० द्या म्हणाला, शेवटी ५० देऊन मिटविले कारण ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्यासमोर तमाशा नको म्हणून. माझी खात्री आहे कि जेथे जमेल तेथे तो असे पैसे काढीत असेल. असे लोकच व्यवसायाला बदनाम करतात.
सरसकट लोक तसे नाहीत . तरीही हे अनुभव सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासी व  रिक्षावाले दोघ्घेही काळजी घेतील.