हे तर सवंग लोकप्रियतेचे समर्थन झाले.
दुसऱ्याच्या मताचा आदर जरूर करावा. पण चुकीच्या कारणासाठी भीड बाळगू नये. लोक म्हणतात म्हणून मग गणपती दूध पितो म्हणावे काय? लोक पितात म्हणून समुद्राचे गोड झालेले पाणी तीर्थ म्हणून प्यावे काय? संजय दत्तला देशभक्त म्हणावे काय? अशा गोष्टींना टीका सोसूनही विरोध केलाच पाहिजे.
आपल्या नैतिक विचारांच्या बैठकीला पटेल असेच वागावे. भले इतरांना नाही पटले तरी. कबीर तर म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी.