सुधीरजी, आपली प्रतिमा इतरांच्या नजरेत चांगली उमटायला हवी, ह्यासाठी लोकप्रियतेचे समर्थन करावे असे मला म्हणायचे नाही.
मनाला पटतील त्या गोष्टी नक्कीच कराव्यात. परंतु मनाला वाटेल ते नेहमीच बरोबर असेल असेही नाही.
गणपती दुध पितो ह्यावर आजच्या जीवनात कोण विश्वास ठेवेल ? कालानुरूप समाज पण बदलत असतोच कि.
अगदी सोपे उदाहरण द्यायचं प्रयत्न करतो.
घरातील तरुण मुलगी रोज रात्री उशिरा घरी येते. बऱ्याचदा उशीर का झाला ह्यावर ती घरच्यांना पटेल असे खोटेनाटे उत्तर देते.
(कारण तिला माहित आहे कि घरातील मंडळींना रात्री उशिरा घरी आलेले आवडत नाही. एखाद दुसऱ्या वेळेस ते समजून घेतात पण रोज च आलेले चालत नाही).
तिला ह्यामध्ये काही गैर वाटत नाही. परंतु हे बरोबर आहे असही नाही.
मुद्दा समाज काय म्हणतो हा नसून आपण आपली कोणासमोर काय प्रतिमा तयार करतो हा आहे, मग ती प्रतिमा घराचांसमोर असेल, मित्रांसमोर असेल किंवा समाजासमोर असेल.
तोफिका जी, मानवजातीपेक्षा प्रत्येकाने फक्त स्वत:चा विचार केला तरी चालेल.
( अती अवांतर : मराठी टाईप करण्यासाठी तुम्ही गुगल इंडिक मराठी वापरू शकता.)