आपली प्रतिमा इतरांच्या नजरेत चांगली उमटली जावी ह्यासाठी स्वतः:ची प्रतिमा स्वतःच्या नजरेत चांगली असली पाहिजे.
या वाक्यातील पहिला भाग पटला नाही. आपण आपल्याला जे योग्य वाटते तेच करावे असे मला वाटते. दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःकडे पाहणे हे प्रसंगी त्रासदायक आणि नुकसान करणारेच असते. याचा अर्थ दुसऱ्याचे अजिबातच ऐकू नये असे नाही. पण कुणाचे आणि किती ऐकावे, कुणाला महत्त्व द्यायचे, आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचे हे प्रत्येकाने आपल्या सारासार विचारशक्तीला स्मरून ठरवावे. समाज अनेक मुखांनी बोलत असतो, प्रत्येकाचे म्हणणे मनावर घ्यायचे  ठरवले तर जगणे अशक्य होईल. 

पिता, पुत्र आणि गाढवाची ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहित असेल. जनलोकात आपली प्रतिमा चांगली असावी, लोकांनी आपल्याबद्दल चांगलेच बोलावे या प्रयत्नात त्यांनी त्यांचे गाढव गमावले ( जे लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या मतांपेक्षा नक्कीच जास्त उपयोगी होते ), आणि त्या बिचाऱ्या गाढवाने आपला प्राण गमावला. पण बोलणाऱ्या लोकांचे काहीच गेले नाही. त्यांची फक्त घटकाभर कमणूक झाली.