स्वत:ची चांगली प्रतिमा दुसऱ्याचा मनात निर्माण करत जगणं ही अत्यंत कष्टप्रद गुलामगिरी आहे. राजकारणी आणि नट असं जगतात. तुमची उत्स्फूर्तता हरवते.

जर तुमच्या मनात स्वत:ची कोणतीही प्रतिमा नसेल तर तुम्ही स्वच्छंद जगता, स्वच्छंद आणि स्वैराचारी यात फरक आहे. स्वच्छंद आपल्या आनंदात असतो त्यामुळे तो दुसऱ्याला कधीही दुखवत नाही.

तुम्ही चुकीच्या मानसिकतेनं जगण्याचा प्रयत्न करू नका कारण ज्या वेळी दुसऱ्याला काय वाटतं असा आपण विचार करतो तेव्हा आपण आपल्याच विचारातून ते ठरवत असतो. अत्यंत प्रामाणिकपणे स्वत:ला जे योग्य वाटेल ते करणं नेहमी श्रेयस आहे त्यामुळे आपल्या कृत्याची जवाबदारी आपल्यावर राहते.

माझ्या लेखावरचा (ध्यान) तुमचा व्य. नि. मिळाला नाही त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही, हवं तर त्या लेखावर विचारा.

संजय