मनीषाजी , 
>>आपली प्रतिमा इतरांच्या नजरेत चांगली उमटली जावी ह्यासाठी स्वतः:ची प्रतिमा स्वतःच्या नजरेत चांगली असली पाहिजे<<
प्रत्येक जण स्वत:च्या प्रतिमेसाठी धडपड करत असतोच. मग कुठे बाहेर जाताना नटून थटून जाणे, मुलीला/तिच्या घरच्यांना  पटवताना तयार होणारी प्रतिमा असेल ! स्वत:च्या नजरेत स्वत:ची प्रतिमा चांगली असेल तर ती इतर लोकांसामोर पण चांगलीच उमटणार आहे ! 

>>दुसर्‍याच्या नजरेतून स्वतःकडे पाहणे हे प्रसंगी त्रासदायक आणि नुकसान करणारेच असते. याचा अर्थ दुसर्‍याचे अजिबातच ऐकू नये असे नाही. पण कुणाचे आणि किती ऐकावे, कुणाला महत्त्व द्यायचे, आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचे हे प्रत्येकाने आपल्या सारासार विचारशक्तीला स्मरून ठरवावे. समाज अनेक मुखांनी बोलत असतो, प्रत्येकाचे म्हणणे मनावर घ्यायचे  ठरवले तर जगणे अशक्य होईल. <<
अगदी बरोबर ! पूर्णपणे मनमानी वागून पण चालणार नाहीये ! आणि " पूर्णपणे लोकांच्या दृष्टीकोनातून कसं दिसेल" असंही वागून चालणार नाही. कोणाचे म्हणणे मनावर घ्यायचे त्याची योग्य निवड करणे महत्वाचे ! 

! आपला प्रतिसाद आवडला! धन्यवाद.

संजयजी,
>>स्वच्छंद आणि स्वैराचारी यात फरक आहे. स्वच्छंद आपल्या आनंदात असतो त्यामुळे तो दुसर्‍याला कधीही दुखवत नाही.<<
एकदम खासच ! 

>>अत्यंत प्रामाणिकपणे स्वत:ला जे योग्य वाटेल ते करणं नेहमी श्रेयस आहे त्यामुळे आपल्या कृत्याची जवाबदारी आपल्यावर राहते.<<
म्हणजे "आपल्या 'प्रामाणिक' कृत्यातून काही "गडबड" होऊ शकते ह्याची  शक्यता नाकारता येत नाही" असं म्हणायचं आहे का ?

मी आपल्याला खालील व्यक्तिगत निरोप केला होता
"प्रेषक: धेयवेडा
प्रति: संजय क्षीरसागर
विषय: इगो, पझेसिव्हनेस या विषयावर आपल्याकडून
दिनांक: गुरु., २२/१२/२०११ - १६:११

एखादा लेख प्रकाशित झाला तर मदत होईल. आपले बरेचसे लेख वाचत असतो. आणि प्रत्येक लेख नेहमीच उपयोगी वाटतो.
यापूर्वी असे लिखाण झाले असल्यास कृपया लिंक द्यावी.
इगो म्हणजे नक्की काय ?
पझेसिव्हनेस म्हणजे नक्की काय ? त्याला कसं काय कंट्रोल मध्ये ठेवता येईल? या संदर्भात आपेल मार्गदर्शन मिळाले तर फार फायद्याचे होईल. 
- ध्येयवेडा "

मनोगत वर "व्यक्तिगत निरोप " सुविधा आहे. त्याची लिंक स्वगृह मध्ये उजव्या बाजूला आहे.