रोहिणी,

कच्चा बटाटा हे मलाही नविन आहे. आम्ही उकडलेला बटाटा वापरतो. अर्थात, आमच्या कडचा साबुदाणावडा खाणारे खुप जणं आहेत. पण मी स्वतः त्याच्या दर्जा बद्दल समाधानी नाही. मला दादरच्या पणशीकरांकडचा साबुदाणा वडा आवडतो.
आम्ही साबुदाणावड्यात नारळाच्या खोबऱ्याचे, काड्यापेटीच्या काडीच्या जाडीचे आणि १ सेंटी. लांबीचे तुकडे घालतो. छान लागतात.
कच्च्या बटाट्याचा प्रयोग करून पाहतो. तसेच, रागीचे (राजगिऱ्याचे?) पिठही कोणी मिसळतात. तोही प्रयत्न करून पाहायला हवा.