करावा. खालील वाक्यांमध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हे (लाल रंगात दर्शवलेली) न वापरल्याने वाचताना, अर्थ लावताना, दमछाक होते आहे. मूळ लेखात या वाक्यांच्या दरम्यान एकही विरामचिन्ह वापरलेले नाही. तुमची शैली छान असूनही विरामचिन्हांच्या अभावी लेख वाचल्याचा आनंद कमी होतो.

त्यांचेही बरोबरच होते. कारण आम्हालाही आम्ही नेहमीप्रमाणेच भरपूर आधी म्हणजे संध्याकाळी सव्वासातच्या उड्डाणासाठी दुपारी तीन वाजता  गेल्यामुळे आमचे बोर्डिंग पास घेण्याचे काम आटोपल्यावर दोन अडीच तास खुर्चीवाल्यांच्या सहवासात बसून काढण्याचे कारण नव्हते. त्यामुळे विमानतळावर वरच्या मजल्यावरील खान पानसेवेचा लाभ घेण्यासाठी गेलो व तेथील कार्यभाग आटोपल्यावर खालच्या मजल्यावर खुर्चीसाठी जायला निघालो. तर ज्या गेटमधून आमच्या उड्डाण स्थळाकडे जायचे ते वाटेतच दिसले व चिरंजीवांनी आम्हाला याच गेटने जायचे आहे असे सांगितल्यावर (सांगितले.) मग खाली जाऊन खुर्ची घेऊन परत वर येण्यासाठी आत्ता होते त्या अंतराच्या दुप्पट अंतर चालण्याचा  द्राविडी प्राणायाम करण्या ऐवजी सरळ त्या गेटने चालतच आत का जाऊ नये, असे माझ्या मनात आले व तसे बोलून दाखवल्यावर सर्वांना विशेषत: सौ. लाही योग्य वाटले. त्यामुळे आम्ही चिरंजीव व कुटुंबीयांचा तेथेच निरोप घेऊन आत शिरलो.

आणखी एक परिच्छेद..

येथे लगेचच उद्वाहकासमोर खुर्च्या उभ्या राहिल्या बरेच प्रवासी आमच्या सारखे खुर्चीधारी होये त्यामुळे उद्वाहकासमोर रांगच लावावी लागली कारण एका वेळी एकच खुर्ची वर जाऊ शकत होती नंतर आम्ही ज्या प्रवेश अधिकाऱ्याच्या समोर खुर्च्या आणल्या तोच कोठेतरी बेपत्ता झाला त्यामुळे खुर्चीमुळे सोयीच्या ऐवजी गैरसोयच होते की काय असे वाटू लागले पण मग दुसऱ्या टेबलावर आमची वर्णी लावण्यात आली व शेवटी तेथून आमचे प्रवास परवाने व आम्ही भरलेला तक्ता पाहून आम्हाला पुढे सोडण्यात आले.