२ वर्षांपूर्वी मलाही अशाच दिव्यातून जावे लागले होते कारण शिकागो - मुंबई हा प्रवास एअर-फ्रांस ने केला होता. एक तर फ्लाईट क्रू चे सौजन्य यथा-तथाच होते, अन विमानतळ आहे की बस-स्थानक असा प्रश्न पडावा इतक्या बसच्या फेऱ्या. टर्मिनल क्र. ३ वरून पहिले टर्मिनल क्र. २ ला जायचे मग टर्मिनल च्या एका टोकावरून दुसरीकडे गेले की पुन्हा एक बस फेरी टर्मिनल क्र. १ ला जाण्यासाठी. वरून विमानतळावरील बहुतेक कर्मचाऱ्यांना इंग्रजीचे जुजबी ज्ञानसुद्धा नाही.

२३ डिसेंबर च्या लोकप्रभामध्ये मेतकूट सदरामध्ये कणेकरांनी छान समाचार घेतलाय या फ्रेंच सौजन्याचा.