पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद गोरे आपल्या लॅपटॉपवर फेसबुक उघडून बसले होते. मित्रांसोबत चॅटिंग सुरू असताना त्यांच्या लक्षात आले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आक्षेपार्ह छायाचित्र एकाने फेसबुकवर टाकले आहे. त्यावर काहींनी बदनामीकारक कॉमेंट्स केल्या आहेत. आपल्या नेत्याबद्दल झालेल्या हा प्रकार पाहून गोरे संतापले. त्यांनी पोलिस ठाणे गाठून यासंबंधी तक्रार केली. सुरवातीला पोलिसांनी नेहमीसारखी टाळाटाळ केली. वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फेसबुक युजर अमित जाधव नामक आरोपीविरुद्ध गुन्हा ...