शुद्धलेखनाच्या चुका आपण दाखवल्यास बरे होईल. कारण " डीसीपी, डीसीपीनी, गर्दम, किशा, आपके, पार्टीमे, है, आप,
आयेगे, तूने, मुझे, क्या, समझके, रखा, श्रीपतराय   इत्यादी व इतर अनेक शब्द लाल रंगाने अधोरेखित असून त्यांचा पर्यायी शब्द
तोच आहे व वेगळी सुचवणी नाही. म्हणून शुद्ध असल्याचा माझा समज आहे. तसेच हे शब्द बदलले तरीही परत शुद्धचिकित्सकाची
मदत घेतल्यास तो तसेच दाखवितो. याचा अर्थ लागत नाही. तसेच काही  शब्द निळ्या रंगाने अधोरेखित आहेत, त्याचाही अर्थ
कळत नाही. माझी चूक होत असल्यास अवश्य दाखवावे. मलाही चिकित्सकाकडून प्रमाणित झाल्याशिवाय लिखाण प्रसिद्ध व्हावे
असे वाटत नाही.  काही शब्द जसे, "तक" याला सुचवणी   "टाक " वगैरे अशी आहे तरी असे सुचवलेले पर्यायी  शब्द योग्य समजावेत का ? आपण खुलासा केल्यास बरे होईल . म्हणजे चिकित्सक वापरणे अवघड वाटणार नाही.