शुद्धिचिकित्सक मराठी शब्दांसाठी आहे. इतरभाषिक शब्द शुद्धिचिकित्सकाला अपरिचित असल्याने ते चुकीचे दाखवले जातात. शिवाय पात्रांच्या तोंडचे शब्द कधीकधी त्या त्या शैलीत लिहिलेले असतात (उदा. ग्रामीण, प्रादेशिक . इ. ) असे शब्दही शुद्धिचिकित्सकाला अपरिचित - म्हणून चुकीचे वाटतात. तसेच सर्व विशेषनामे शुद्धिचिकित्सकाला माहीत असतीलच असे नाही.
शुद्धिचिकित्सकाने चुकीचे म्हणून दाखवलेले लेखकाचे मराठी शब्द निवडून दुरुस्त करावेत. शिवाय पात्राच्या तोंडचे शब्द प्रमाणित मराठीत असतील आणि त्यात चुका दाखवलेल्या असतील तर त्याही दुरुस्त कराव्या.
आणखी काही शंका असतील तर अवश्य विचाराव्या. त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न वेळाच्या उपलब्धतेनुसार केला जाईल.
स्वारस्याबद्दल धन्यवाद.