मनुदेवी,
मी वरील भाजी करून पाहिली आणि ती अतिशय उत्तम आहे यात शंका नाही. तिला पावभाजीची भाजी म्हणावं की नाही या वादात फारसा अर्थ नाही. शिळ्या वरणाची चव सुमार असते हे पटण्यासारखं नाही. मुळात आपण वरण कसं करतो यावर ते अवलंबून आहे. फ्रीजच्या वापरामुळे वरण चांगलं दोन दिवस वापरता येणं सहज शक्य आहे. जेव्हा आपण हॉटेलात जाऊन डाळ तडका मागवतो त्याचवेळी आचारी डाळ कुकरमध्ये लावत असेल असं वाटत नाही. तो जर असं करायला लागला तर हॉटेल चालणं कठीण आहे.
वरील भाजी ही पराठ्याबरोबरही छान लागते. त्याचप्रमाणे शिळं वरण वापरून थालिपिठ किंवा तिखट मिठाच्या पुऱ्या खरोखरीच छान लागतात.
आपली भाजी १००% पास आहे. अजून अशा काही पाककृती असल्यास जरूर लिहा.
अवांतरः माझ्या वरील म्हणण्याचा अर्थ वरण हे नेहमी शिळं करूनच खाल्लं पाहिजे असा अजिबात नाही. काही वेळेस जास्तीचं वरण जर उरत असेल तर वरील भाजीसरखे प्रयोग करून पाहता येतील.