इंग्रजांमुळे भारताला फायदाच झाला असे म्हणता येइल.त्या काळात भारत देश 'सोन्याची खाण' होता. भारतातील राजे-रजवाडे विलासात दिवस काढत होते. वर कोणितरि म्हटल्याप्रमाणे राजांचे प्रजेकडे व देशाच्या प्रगतिकडे बिल्कुल लक्ष नव्ह्ते. या काळात मुघलांनी आणि इतर परकियांनी भारतावर आक्रमाणे केली व संपत्ती लुटण्यास सुरुवात केली, देशातील मंदिरे पाडुन मशिदी बनवल्या व सर्वत्र अराजकता माजली होती.
याच काळात इंग्रज भारतात आले, मान्य आहे त्यांनीही लुटालुट केली, कोहिनूर हिरा पळवला, राज्यांच्या सरदारांना फितूर केले, कट-कारस्थान रचण्यास भाग पाडले, पण हे सारे इंग्रज नसते तरी होणारच होते, पण या बरोबर इंग्रजांनी देशात सुधारणा घडवून आणल्या. पोस्ट ऑफिसे, आगगाड्या, तार, ठगांचा बंदोबस्त , विद्यापीठे इ. लोकोपयोगी गोष्टी सुरू केल्या, इंग्रज शिस्तिचे होते, नुसते विलासात रमणारे नव्ह्ते. त्यांनी इथे बोकाळलेल्या ढिलाईपणाचा व परस्परांवर कुरघोडी करण्याऱ्या राजांचा फायदा करून घेतला.
इंग्रजांकडून शिकण्यासारखे बरेच होते, ते व्यवहारी होते, आज आपण जो इतिहास वाचतो त्यामधून शिकण्यासारखे आहे, 'बळि तो कान पिळि' हि संज्ञा लक्षात ठेऊन देशाची आर्थिक, शैक्षणिक , तंत्रज्ञानाची ताकद वाढवली पाहिजे.
आज अमेरिका, जपान देश वरिल बाबींमध्येच अग्रेसर आहेत व प्रगत राष्ट्रे म्हणुन गणली जातात. आपण आपल्या नैसर्गिक कमतरतांवर(लोकसंख्या, वर्ण-जाती भेद) मात करुन व आधी अनुभवायला आलेल्या गोष्टि लक्षात ठेउन वाटचाल केली पाहिजे व ती वाटचाल आजची तरुण पिढी करतेय... याचे श्रेय बऱ्याच अंशी इंग्रजांना जाते असे वाटते.
(इतिहासात जे काही झाले ते वाईटच झाले.... पण मी इथे थोडा वेगळा विचार मांडला आहे.....)