बाकी स्पष्टीकरणे देण्याच्या नादात मूळ पुस्तकाविषयी अगदी थोडेसेच लिहीले गेले. त्यातून ती रहस्य कथा असल्याने परीक्षणकारांची पण पंचाईतच होत असणार...जास्ती काही लिहावे तर रहस्याची उकल व्हायची!
पण आर के नारायण आणि मालगुडी वरचे भाष्य मात्र नाही पटले.....मालगुडी डेज मधल्या निर्व्याज -उत्साही विनोदाने मनाला जो निखळ आनंद दिला तो त्यांना कुणी प्रमोट केले होते म्हणून कमी होऊ शकत नाही.
बाकी बोटीवरचे जीवन आणि भाषा वापरण्याच्या काहींच्या 'अनंत' आसक्ती बद्दल एकदम सहमत!