शाळा आणि कॉलेजमधली बरीच मुलं  ' डान्स ' शिकत असतात. आपण शिकलेल्या कलेतून ' एक्सप्रेस ' करावे, चार लोकांनी आपल्याला पाहावे, आणि त्यांचे चार क्षण चांगले जावे असा हेतू असावा. थोडं कौतुक झालं की पुढे शिकत राहायला हुरूप राहतो. हा फ्लॅश मॉब आधी सराव करून बसवलेला असतो. महाजालावरील अनेक व्हिडीयोच्या शेवटी  नृत्य दिग्दर्शकाचे आणि त्यांच्या क्लासचे नाव असते. एखादा मंच घेऊन कार्यक्रम करणे आणि ते बघण्याकरता लोकांनी खास यावे हे अवघड आहे. शिकणाऱ्या आणि हौशी कलाकारांकरता फ्लॅश मॉब हा खूप चांगला मंच आहे.
अर्थात सुरक्षेची बाजू सांभाळणे हेही तितकचं महत्त्वाचं.

नैराश्य, न्यूनगंड, जवाबदार्या आणि अपेक्षांचं दडपण घेऊन जगणाऱ्या पोट सुटलेल्या पोख्त माणसाचे तेव्हडेच चार क्षण ह्या अनपेक्षित आणि हलक्याफुलक्या करमणुकीने चांगले जातील ही ईच्छा असणार.