प्रतिसाद वाचण्याची सध्याची धाटणी ajax ह्या आधुनिक तंत्रावर आधारित आहे. ह्यात (मनोगतावर) अद्याप काही त्रुटी आहेत. आपण जे पान वाचतो त्यातले जे प्रतिसाद उघडतो, तेवढेच सेवादात्याकडून आपल्या यंत्रावर येतात आणि तेथेच राहतात. असे केल्याने जालावरील जाये बरीच कमी होते. पूर्वी आपल्या यंत्रावर आलेले प्रतिसाद काही काळ तेथेच पकडून ठेवले जातात आणि पुन्हा मागवले तर ते तेथूनच दिसतात.
आय ई ची एक अडचण आहे, आणि त्यावर आमचा उपाय चालू आहे. तोवर आपल्याला प्रतिसाद वाचायला काही अडचण आली तर आपल्या ब्राउझरची पकड (कॅश) रिकामी करून पुन्हा ते पान मागवा, पानाची नवी आवृत्ती दिसायला हवी. अर्थात आपल्याला काही न करता नवी आवृत्ती मिळावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच.
मोझिला, फायरफॉक्स, नेटस्केप ह्यांवर ही त्रुटी अद्याप दिसलेली नाही.