कथा छानच आहे. पण "अगदी लहानपणीच वडिलांचे पितृछत्र हरवले." हे वाक्य जरा खटकते. 'पितृछत्र' या शब्दामध्येच 'वडिल' हा शब्द सामावलेला आहे. त्यामुळे विवेकच्या वडिलांचे पितृछत्र हरवले असा अर्थ ध्वनित होतो. यावरुन मला 'मुलांचे बॉयज होस्टेल' किंवा 'मुलींचे गर्ल्स होस्टेल' हे आम्ही कधी काळी वापरत असलेले गमतीदार शब्दप्रयोग आठवले. बाकी कथा मस्त जमलेली आहे. कीप इट अप, सर!!