मी खाजगी कंपन्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून ३०-३५ वर्षे काम करून निवृत्त झालो आहे. परवाने मिळवणे हे आपण समजता तसे काही कठीण काम नाही. किंबहुना एक नवीन 'बकरा' मिळणार या आशेने कामे तत्परतेने होतात. फक्त आपला दृष्टिकोन सकारात्मक हवा आहे.
१. आपण दिलेल्या पर्वान्यांच्या यादीपैकी २, ३, ४ आणि ६ या परवान्यांची जरूर या उद्योगाला लागत नाही.
२. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिलेल्या दुसऱ्या यादीतील कागदपत्रांची आवश्यकता आहेच. ती नसतील तर आपण ..... आहात, ...... ठिकाणी राहाता, ..... आपले शिक्षण ....... आहे, आपले पैशाचे व्यवहार चोख आहेत याला पुरावा काय? जर नसेल तर आपल्याला परवाना का द्यावा? ते सिद्ध करण्यासाठीच ही कागदपत्रे हवी असतात,
३. लाच द्यावीच लागते नाहीतर काम होत नाही हे खोटे आहे. फक्त आपल्याला नियम बरोबर ठाऊक पाहिजे आणि कागदपत्रे व्यवस्थित सादर करायला हवीत. मी बहुतेक कामे लाच न देताच करीत असे. लाच दिली ती आडवळणाने कामे करून घ्यायलाच. तरी, आपले काम सकारात्मक दृष्टीने केले तर लाच न देताही कामे वेळेवर होतात.
४. लाच ही बहुतांशी व्यावसायिकाच्या इच्छेनेच काहीतरी लघुमार्ग - शॉर्टकट काढायसाठी दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांचा/अधिकाऱ्यांचा दोष हा ५० टक्के असतो.
५. तोट्यात चाललेले बहुतेक उद्योग चुकीच्या व्यवस्थापनामुळे किंवा व्यवस्थापनाने केलेल्या आर्थिक अपहारामुळे बंद पडलेले/पाडलेले असतात.
६. व्यावसायिक आणि उद्योगपती यांना पारदर्शी सरकारी कारभार हवा असतो. पण किती व्यावसायिक/उद्योगपती यांचे व्यवहार पारदर्शी असतात? एखादा उद्योगपती सर्वसाधारण सभेमध्ये विक्री आणि फायद्याचे आकडे सांगतो ते ऐका आणि आयकर विभागाला किंवा यूनियन लीडरशी बोलणी करतांना सांगतो ते आकडे ऐका. तेव्हा उद्योगपती/व्यावसायिक तेवढे प्रामाणिक आणि सरकारी अधिकारी/कर्मचारी तेवढे भ्रष्टाचारी हे विधान कितीसे बरोबर आहे.
७. कोणताही व्यवसाय करतांना सकारात्मक दृष्टीकोन असावा लागतो, कठीण/विपरीत परिस्थित प्रयत्नांची कास न सोडता वाममार्ग न पत्करता मार्ग काढून टिकाव धरावा लागतो. माझी आपणांस विनंती आहे की आपण जरूर उद्योग सुरू करावा. असे निराश होऊन चालत नाही. यश नक्की मिळेल. माझ्याकडून अनेक शुभेच्छा.