मला तर हल्ली असं वाटतय, की आपलं जीवन ठरवून ठेवलेलं आहे आणि काय ठरवलय ते प्रत्येकाला माहित नाही. आपलं जीवन
खडतर आहे की सुखावह याने चैतन्याला काहीही फरक पडत नाही.प्रत्येक जीवन हा एक सृष्टीचा नियम असावा, ज्यावर आपला ताबायेऊ शकत नाही. अध्यात्म वगैरे इतर सर्व सिद्धांत हे मनाला शांत करण्याचे उपाय असावेत, पण आपल्या जीवनापेक्षा त्यांना
महत्त्व जास्त नाही. तसेच जगाची निर्मिती सगळ्यांसाठी झालेली आहे. त्यामुळे जग एकच असून सर्वांना वेगवेगळं दिसत असावं.
मानसिक शांतता अशी "लेबल " लावलेली गोष्टच नसावी. किंवा जीवन हा फार मोठा भ्रम असावा. ज्याला जसा जन्मतः मिळाला
तसाच तो राहतो.तोच त्याला ओळखीचा वाटतो. आपण व्यर्थ धडपड करू नये. फक्त आपली इथलं राहणं सुखावह होतय किंवा
नाही हे जरूर पाहावं व जमेल तसं ते सुखावह करण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. फारसे अट्टाहास धरू नयेत. ज्यातून दुःख निर्माण होतय ते आपले भोग समजावेत व भोगण्यास तयार राहावं. हे माझं लिखाण जरा जास्तीच होतय असं वाटतय. पण मला हे नेहमीवाटतं कसही वागलं तरी मरण अटळ आहे , आणि ते आहे हे बरं आहे. थोडा विचार करून पाहिल्यास अमरत्व हा शाप ठरेल असं वाटतं. संजय साहेब या बाबतीत लिहितात म्हणून अशी मतं मांडता तरी येतात. त्यांचे लेख
काही वेळा काही प्रश्नांची उत्तरंही देतात , असा माझा अनुभव आहे. लिखाण अप्रतिम असतं. या विषयावर रंजक लिहिणं कठीण आहे.
नाहीतर आम्ही कशाला कथा लिहित बसलो असतो ?