>कर्म सिद्धान्त किंवा पूर्वजन्म आणि फ्री विल हे या प्रकृतीच्या अगम्य लिलेशी निगडीत असू शकते का?
= पहिली गोष्ट कर्मसिद्धांत लोकांनी नैतिकतेनं वागावं म्हणून आहे त्याचा अस्तित्वाच्या रहस्यमयतेशी काहीही संबंध नाही. तसं असतं तर (काल्पनिक की सत्य हा वाद सोडा पण) राम आणि रावण एकाच वेळी असू शकले नसते.
प्रामाणिकपणा तुम्हाला व्यक्तिगत एकसंधता देतो, तुम्ही तुमच्या कृत्याबद्दल निश्चिंत राहाता पण याचा अर्थ तुमच्यावर कोणतीही आपत्ती ओढवणार नाही किंवा संकट कोसळणार नाही असं नाही. खरं तर ती अस्तित्वाची निर्वैयक्तिकता आहे, एनिथिंग कॅन हॅपन टू एनीबडी एनी टाइम.
थोडक्यात कर्मसिद्धांत ही कल्पना आहे.
दुसरी गोष्ट, पूर्वजन्म किंवा पुनर्जन्मही देखील कल्पनाच आहे. ट्राय टू अंडरस्टॅंड धिस.
जेव्हा एकादी व्यक्ती मरते तेव्हा तिचा संपूर्ण देह पुन्हा अस्तित्वातल्या पंचत्त्वांशी समरूप होतो, इट इज अ रिसायकलींग प्रोसेस फॉर द नेक्स्ट बॉडी टू फॉर्म. त्या प्रक्रियेमध्ये मेंदू कंप्लीटली फॉरमॅट होतो जेणेकरून सर्व डेटाबेस संपूर्णत: डिसइंटीग्रेट होतो त्यामुळे नव्या देहाला नवी कोरी हार्डडिस्क मिळते. पण काही वेळा मेंदूतला सर्व डेटा पूर्ण फॉरमॅट होत नाही मग असा एखादा अंफॉरमॅटेड डेटा नव्या देहाच्या मेंदूत प्रस्थापित होतो त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या नव्या आयुष्याशी असंबधीत अश्या स्मृती किंवा कौशल्य प्राप्त होतात आणि आपल्याला वाटतं अमुकतमुक व्यक्तीचा पुनर्जन्म झाला.
तिसरी गोष्ट, फ्री विल, याचा खरा अर्थ अस्तित्वात मूलत: असलेला स्वच्छंद किंवा मी म्हणतो ती रहस्यमयता आहे. संपूर्ण अस्तित्वात एक समन्वय, तोल आणि कमालीची बुद्धीमत्ता आहे त्यामुळे अस्तित्व स्वत:च्या प्रकटीकरणातला तोल सांभाळत असतं पण अस्तित्व हा तोल कसा सांभाळेल हे अगम्य आहे म्हणजे शास्त्रज्ञ काहीही म्हणोत पण तापमान पराकोटीचं वाढलं तर सूर्य केव्हाही विझू शकतो (जस्ट टू अचिव द बॅलन्स) आणि त्याला कोणीही काहीही कारणमिमांसा लावू शकणार नाही कारण इथे कुणीही शिल्लक उरणार नाही!
संजय