मनोगताने मराठी भाषेतून विचार आदानप्रदान करायला जी सोय केली आहे ती जितकी वापरावी तितकी थोडीच. मनोगतावर नवीन सोयीही दिवसेंदिवस वाढत आहेत.

मराठीमध्ये लिहिण्यासाठी उपलब्ध असलेल्या मनोगताच्या तंत्रज्ञानाचा उपयोग बाकीच्या मराठी संकेतस्थळांवर करता येईल का? बऱ्याच संकेतस्थळांवर google ची शोधसेवा जशी उपलब्ध असते तशी मनोगताची मराठी लिहिण्याची सेवा इतर ठिकाणी उपलब्ध करून दिली तर मनोगताची महती अजून वाढेल असा माझा एक विचार..