>"अहं" कुणालाच चुकत नाही आणि कुणाचाच सुटत नाही. कितीही मोठमोठे लेख लिहिले तरी. असो!!!
= 'माझं लेखन दुर्बोधही नाही आणि असंगत असणं तर शक्यच नाही!
हा माझ्या लेखनातला निर्विवादपणा इतरांना अहंकार वाटत असला तरी तो माझा आत्मविश्वास ( मी आत्मा आहे हा विश्वास) आहे आणि हे लेखन पूर्वग्रह सोडून वाचणाऱ्या चाहत्यांशी मी तो शेअर करतोयं, तो त्यांनाही लाभावा या आंतरिक इच्छेनं लिहीतोयं.
> बाकी लेखाबद्दलचं मत अजिबात बदललेलं नाही कारण श्वास नाभीपर्यंत कसा पोचवायचा हे काही कळालं नाही. माझा श्वास फुफ्फुसापर्यंतच जातो.
= जेव्हा मानसिक प्रक्रिया थांबते तेव्हा श्वास नाभीपर्यंत पोहोचतो म्हणून तर लहान मुलांचा श्वास पोटातून चालू असतो कारण त्यांची मानसिकता सघन झालेली नसते. गाढ झोपेत आपला श्वास देखील नाभीपर्यंत पोहोचतो कारण मनाची प्रक्रिया शिथील झालेली असते.
जवळजवळ सर्व मनोकायिक डिसऑरडर्स (हृदरोग, मधुमेह, दमा, रक्तदाब, मानसिक अस्वास्थ्य) श्वासाचा जोम कमी झाल्याचा परिणाम आहेत कारण श्वासातून मिळणारी उर्जा नाभी ऐवजी मेंदूत अविरत चालू असलेली विचारप्रक्रियाच खेचून घेतेयं आणि त्यामुळे श्वास उथळ होतो.
कोणत्याही प्राणायामचा हेतू श्वासाचा जोम वाढवणं, पर्यायानी तो नाभीपर्यंत पोहोचवणं आहे.
बुद्धाची सर्वमान्य आध्यात्मिक प्रक्रिया ‘विपश्यना’ (श्वासाशी अनुसंधान) ही जाणीवेचा रोख मानसिक प्रक्रियेकडून श्वासाकडे वळवण्याची प्रक्रिया आहे.
>माझ्या अंदाजानुसार जाणीव ही मेंदूचीच एक क्रिया आहे. (आणि जाणीव ही नाभीत कशी काय असते बुवा? )
= तुम्ही शांत बसलेले आहात आणि मागून अचानक कुणी तुमच्या खांद्यावर हात ठेवला तर प्रथम ‘तुम्हाला’ स्पर्शाची जाणीव होते, मग तुम्ही कोण आहे यासाठी वळून बघता, ती व्यक्ती पाहून मेंदूतली स्मृती तुम्हाला सांगते ‘अरे, हा तर आपला मित्र! ’
जाणीव 'आपल्याला' होते, मेंदूत संग्रहित स्मृती असते. जाणीव आणि नंतर स्मृतीतून जाणीवेचं डिकोडींग इतक्या वेगात घडतं की आपल्याला वाटतं जाणीव मेंदूत आहे.
जाणीव निराकार आणि असीम आहे, नाभीत नाही. नाभी हे शरीराचं शक्तीकेंद्र अशा अर्थानी आहे की श्वास नाभीपर्यंत पोहोचला की ‘श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन’ या तीन फंडामेंटल शारीरिक क्रिया उत्तम चालायला लागतात.
तुम्ही लक्षपूर्वक वाचलं असेल तर मी शेवटी लिहीलंय : ‘लोकलाईज झालेली जाणीव’ म्हणजे अहंकार, ज्या क्षणी जाणीव मेंदूत नसून ती निराकार आणि असीम आहे हा उलगडा होतो त्या क्षणी तुम्ही सिद्ध होता किंवा त्या उलगडा होण्याला स्वरूप गवसणं म्हटलंय. आपण व्यक्ती नसून निराकार जाणीव आहोत हेच तर सांगायचा मी प्रयत्न करतोयं!
>बाकी पु. बऱ्या ले. शु. आहेतच.
= धन्यवाद! खरं तर तुमच्या प्रतिसादामुळे मला पुन्हा लिहीण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
संजय