जेव्हा मानसिक प्रक्रिया थांबते तेव्हा श्वास नाभीपर्यंत पोहोचतो म्हणून तर  लहान मुलांचा श्वास पोटातून चालू असतो कारण त्यांची मानसिकता सघन झालेली नसते. गाढ झोपेत आपला श्वास देखील नाभीपर्यंत पोहोचतो कारण मनाची प्रक्रिया शिथील झालेली असते."
बरं!!!
"तुम्ही शांत बसलेले आहात आणि मागून अचानक कुणी तुमच्या खांद्यावर हात ठेवला तर प्रथम ‘तुम्हाला’ स्पर्शाची जाणीव होते, मग तुम्ही कोण आहे यासाठी वळून बघता, ती व्यक्ती पाहून मेंदूतली स्मृती तुम्हाला सांगते ‘अरे, हा तर आपला मित्र! ’"
हि "स्पर्शाची जाणीव" कशी होते? समजा मेंदूने काम करायचे बंद केले तर तुमच्या खांद्यावर हात ठेवलेला समजेल काय?
असो. तुमचं चालू द्या. मागे ओशोबद्दलचे लेख (बहुधा तुमचेच असावेत. नसतील तर क्षमस्व) बघितले होते तेव्हांच हा (म्हणजे पहिला) प्रतिसाद टाकणार होतो पण परवलीचा शब्दच आठवेना.  
बाकी "चालू द्या" एवढंच सांगू शकतो. फार खोलात जाण्यात अर्थ नाही. प्रत्येक वाक्यावाक्याला (की शब्दाशब्दाला? उदा. सघन मानसिकता) मतभेद होतील.  
"तुमच्या" लेखमालेतील या अनपेक्षित व्यत्ययाबद्दल क्षमस्व.