पाककृती चांगली वाटते आहे. उगिचच  खुसपट काढत नाहिये, पण एक शंका...

आपल्याकडे मुरांबा / मोरांबा काय म्हणाल ते -  (साखरेच्या पाकात मुरवलेला म्हणून मुरांबा तसेच मुरावळा= मोरावळा) लोकप्रिय आहे. पण अननसाचा मोरांबा आणि आता पेरुचा मोरांबा / मेथांबा हे जरा मजेशीर वाटते नाही का?

याला पर्याय नाही का? म्हणजे अगदी ओढून ताणून अननसांबा किंवा मोर्पेरू करावे असे मी म्हणत नाही...

बघा, जरा पाककृती बाजुला ठेवून 'शब्दाचा किस' कसा होतो पाहुया??

माफ करा - पण निव्वळ गम्मत आणि त्यातून ज्ञानात काही भर पडली तर बरेच..