मेथांबा हा शब्द मलाही माहीत आहे. प्रत्येक मुरांबा, साखरांब्यात मेथ्या घालत नाहीत. त्यामुळे ज्यात घालतात तो मेथांबा, इतर मुरांबे वा साखरांबे. माझी आजी आंब्याचा मेथांबा करीत असे तो फार चविष्ट लागे. खरे तर हे पदार्थ आंब्याचेच करीत म्हणून मुरलेला आंबा, साखरेतला आंबा, मेथ्या घालून आंबा असे मुरांबा इत्यादी शब्द प्रचलित झाले असावेत. पण इतर फळे वापरूनही ह्या पाककृती केल्या तरी नावे तीच राहिली असावीत.
पेरूचा मेथांबा मी कधी खाल्ला नाही, मात्र पककृती वाचून छान लागत असेल असे वाटले.