मी आपटे -कोश पाहिला नव्हता. नंतर शोधताना समजले की मोनियर-मोनियर-विल्यम्स निश्रयणी तर देतोच, पण आणखी तीन पर्याय देतो. नि:श्रयणी, निःश्रयिणी आणि निःश्रेणी. ज. वि. ओकांच्या कोशात मात्र निश्रयणी दिलेला नाही, पण  निःश्रयणी, निःश्रयिणी, निःश्रेणि‌ आणि‌ निःश्रेणी हे चार शब्द दिले आहेत.. म्हणजे  त्यांच्या मते नि‌ नंतरचा विसर्ग आवश्यकच आहे. संस्कृत कोशरचनेच्या पद्धतीप्रमाणे 'नि:'ने सुरू होणारे सर्व शब्द 'नि'ने सुरू होणाऱ्या शब्दांच्या खूप आधी असतात, हे मी लक्षात घेतले नव्हते, म्हणून मला शब्द सापडला नाही.

बाकी, माझ्या प्रतिसादाला त्वरेने दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल मनापासून आभार.---अद्वैतुल्लाखान