नमस्कार,
सर्व तुकडे जोडून पूर्ण चित्र अजून समजलेले नाही. चित्र जोडायचा प्रयत्न केल्यास खालील प्रश्न मला नेहमी पडतात,
* आपणा सर्वांमधील मी हा सर्वांसाठी एकच असेल, तर आपणापैकी प्रत्येकाला आपला मी वेगळा आहे असे का वाटते? कित्येक सिद्ध पुरुष या खऱ्या मी ला जाणू लागले. म्हणजे निराकाराला निराकाराची जाणीव झाली. मग मला त्याची जाणीव आपोआप का नाही होत? सिद्ध पुरुषाची ती जाणीव त्याच्या मर्त्य शरीराला का बांधलेली आहे? ही निराकाराची होणारी जाणीव हा या शरीरातल्या मी ला होणारा भास आहे असे नाही का म्हणता येणार? सिद्धपुरुषाच्या शरीराला कोणी इजा केली की त्याला वेदना होतील. (म्हणजे मेंदूला जाणवतील). तश्याच दुसऱ्या कोणाच्यातरी मेंदूला जाणवलेल्या वेदना या सिद्ध पुरुषाला का समजत नाहीत?
हा सनातन मी जर अबाधित आणि एकच आहे, तर शरीराला मी समजणारा कोण आहे?
* निराकार जर सर्वाच्या पलीकडे आहे, तर हा देहाच्या बाहेर त्याचे अस्तित्व का नाही जाणवत? एखाद्या खुर्ची टेबलाला, किंवा मेलेल्या शरीराला बोध का नाही होत? त्या साठी मनुष्याचे जिवंत शरीरच का लागते? म्हणजे पुन्हा या सर्वाला आपले शरीर आणि मेंदूद्वारे होणाऱ्या संवेदना या बाहेर काही स्थान आहे का? (आपल्या अस्तित्वाची जाणीव ही कुठेतरी मेंदू, न्यूरॉन्स च्या पलीकडली आहे असे मला वाटतेच, पण मेंदू आणि न्यूरॉन्स च्या बाहेर कोणाला ही जाणीव असल्याचे कळलेले नाही)