लेखकास ही कथा चारचौघांस जाहीरपणे सांगावीशी वाटली याचे आश्चर्य वाटते. बहुधा आत्मचरित्र लिहिण्याचा मानस असावा.

इतिहासात एका महात्म्याने आपल्या खाजगी आयुष्यातील चुका* अशाच प्रकारे आत्मचरित्रातून जाहीररीत्या लिहिल्याचे उदाहरण आहे, तेव्हा चालू** लेखकाने केलेल्या प्रकारास पूर्वप्रघात नाही, असे निश्चितच म्हणता येणार नाही. परंतु, प्रकरणास*** शीर्षक देताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, असे सुचवावेसे वाटते. चालू**** शीर्षक आत्मचरित्रात शोभून दिसेल, असे वाटत नाही. (त्या महात्म्याच्या काळात खचितच शोभून दिसले नसते; आजही कितपत शोभून दिसेल याबद्दल साशंक आहे.)

बाकी, लेखाला आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले, तर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया जर त्या महात्म्याच्या लेखनास प्रकाशनाचे वेळीच मिळाल्या असत्या, तर आज कदाचित आपल्याला 'हे राम! ' या वाक्प्रयोगाचा उगम १९२५ सालीच - त्या महात्म्याच्या भर हयातीत - सापडला असता, असे मानावयास जागा आहे. अर्थात, आजच्या युगाच्या प्रथांस आणि ष्ट्यांडर्डास (मराठी?) लक्षात घेता, आलेल्या प्रतिक्रिया या कालोचितच आहेत, असे म्हणावे लागेल. 'O tempora! O mores!' (दुवा क्र. १) किंवा, 'कालाय तस्मै नमः|'



* (त्या महात्म्याच्या मते. आय कुड केअर लेस, वन वे ऑर दि अदर. (मराठी?))
** (साधारणतः 'प्रस्तुत' किंवा 'करंट' अशा अर्थी.)
*** ('चॅप्टर' अशा अर्थी.)
**** (वरील **प्रमाणेच. गोळाबेरीज अर्थः 'सध्याचे'.)