विनयाक - माझ्या कथा सत्यघटनेवर आधारित असतात हे खरं आहे :-). ह्या कथेतले  काही प्रसंग काल्पनिक आहेत पण विनय, सविताचे खरे स्बभावर मी रेखाटले आहेत.  एकूणच अपयश माणसाला खच्ची करतं, दुर्बल बनवतं मग यशस्वी व्यक्ति आत्मपौढ वाटायला लागते/होते. त्यातून कुवत असतानाही आलेलं अपयश मनात इतकं खोल रुजतं की दुसर्‍या माणसाची कोणतीही कृती सहेतुक, नामोहरम करणारी वाटायला लागते, नेमकं तेच विनयचं झालं आहे. काही वेळेस माणूस पेटून उठतो तर काही वेळेस उमेद हरवून बसतो. विनयया आयुष्याला निराशेने वेढलं आहे. आणि दुर्देवाने असे अनेक विनय  आणि सविता आहेत या जगात.