>पहिल्या लेखात तुम्ही म्हणाला होतात, की सगळे दरवाजे दिवाणखान्याच्या मध्याशी उघडतात, ते जाणवत राहते. तरीही प्रत्येक दरवाजातून जाण्याचा प्रयत्न चालू आहे. काही वेळा सुरूवातीलाच अडते. पण काही दरवाजे तुलनेनं सोपा मार्ग दखवतात!

= प्रत्येकाच्या धारणा, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे त्यामुळे एकाच सत्याच्या अनेक पैलूंपैकी कुणाला एक आवडेल तर कुणाला दुसरा पण सगळे दरवाजे दिवाणखान्याच्या मध्याशी उघडतात हे निर्विवाद आणि हा एक समान धागा तुम्ही धरून ठेवलात तर तुम्हीच तो दिवाणखान्याचा मध्य होतात हे कळायला वेळ लागणार नाही.

>ते सगळे दरवाजे आमच्यासाठी उघडल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अध्यात्म ही खूप अवघड किंवा काही विशिष्ट लोकांसाठीची गोष्ट नसून रोजचं जीवन आनंदी करण्याचा मार्ग दाखवणारा पर्याय आहे, ह्याची जाणीव केवळ तुमच्या लेखांमुळेच होवू शकली. आभार!

= हे असे प्रतिसाद आले की मला कळतं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, मग तुम्ही कोण आहात किंवा कुठे आहात यानी काहीही फरक पडत नाही आणि मला कमालीचा आनंद होतो कारण मी पुन्हा स्वत:प्रत आलेला असतो

संजय