श्री. म. माटे यांनी अस्पृश्यसाठी पर्याय म्हणून अस्पृष्ट हा शब्द रूढ केला असे वाटते. अस्पृश्य = स्पर्श करण्यास अयोग्य, अस्पृष्ट = पूर्वी अस्पृश्य समजले जाणारे पण आता तसे नसलेले असा भेद त्यांनी सांगितला होता. त्यांचे "अस्पृष्टांचा प्रश्न" हे पुस्तकही वाचले आहे. या छटेमुळे इथे दोन्ही शब्द अयोग्य वाटतात.

अनाघ्रातला समानार्थी  शुद्ध, निर्भेळ या अर्थाने ज्ञानेश्वरांनी वापरलेला "अचुंबित" हा शब्दही मला आवडला.

उदा. तयातेति गिंवसित। हे ज्ञान पावे निश्चित।
जयामाजी अचुंबित । शांती असे ॥ १८९, अध्याय ४

विनायक