मला वाटते, लेखात अस्पृश्य हा शब्द आलेलाच नाही.  शब्द आहेत ते अस्पर्शित आणि अस्पर्श. त्यातला पहिला अस्पृष्ट, वंदितप्रमाणेच कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे आणि दुसरा नञ्‌ बहुव्रीहि समासयुक्त शब्द(नाही स्पर्श झाला ज्याला तो). लेखात आलेले दोन्ही शब्द योग्य अर्थाने आले आहेत. ते जर चुकीच्या अर्थाने वापरले गेले असते तर तो लेख कलंकितच समजला गेला असता. सुदैवाने, हा लेख तसा नाही.

अस्पृश्य आणि वंद्य ही ल्यबन्‍ते आहेत.  .
---अद्वैतुल्लाखान